Author Topic: आठवण आली तुझी की,  (Read 3659 times)

Offline aryanbhv

  • Newbie
  • *
  • Posts: 27
आठवण आली तुझी की,
« on: April 03, 2011, 04:50:06 PM »
आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…
पण तरिही………
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Kiran Mandake

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
Re: आठवण आली तुझी की,
« Reply #1 on: April 04, 2011, 04:16:26 AM »
 >:( श्रद्धुड्याची एकदम कुणीतरी जाणून बुजून आठवण करून दिल्यासारखी वाटल !  >:(