Author Topic: माझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती : शर्वरी  (Read 1502 times)

Offline sharvari

  • Newbie
  • *
  • Posts: 6
आज मनात खूप ढग दाटून आले, काही कोरडे काही ओले
त्यांचा गडगडाट, विजेचा लाखलाखाठ विचारांचा काहूर मनात दाटला.
डोळ्यांतून रिमझिम पाऊस बरसू लागला.
खिडकी बाहेर पाऊस धुवाधार कोसळत होता,
मनाच्या कवाडावर आठवणींचे थेब तडातड वाजवत होता.
सोसाट्याच्या वाऱ्याने उडून जाणारे छप्पर,
वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहत होते.
आयुष्यातल्या वादळाने तर माझ्या डोक्यावर छप्परच ठेवले  नव्हते.
आसवानी रोज भिजणाऱ्या  मनाला
आज ह्या पावसात चंद्रचिंब भिजवाव.
मनातल्या ह्या भ्ग्भाग्णाऱ्या निखाऱ्याना
ह्या थेबांनी आज खरच विझवाव
ह्या वेळी अवेळी बरसणाऱ्या पावसाचा खूप त्रास होतो.
कधीही बरसून आयुष्य ढवळून सर्वस्व उध्वस्त करून जातो.
डोळे बंद करून पावसात उभी राहून आसवांना वाट मोकळी करून दिली.
ह्या पावसाने कि माझ्या आसवांनी कळेना
कशाने मी झाले चीम्ब्चींब ओली.
डोळे उघडून पहिले तर तू समोर हसत उभा होतास.
तुझ्या ओंजळीत माझ्या स्वप्नांचे इंद्रधनुषी रंग घेऊन आलास.
स्वप्न,आभास कि पुन्हा तेच फसवे क्षण? मनात भीती दाटून आली.
पण तुझ्या प्रेमाच्या मयुरपंखी रंगानी हि मीरा दिवानी झाली.
तुझ्या स्पर्शात, तुझ्या मिठीत धगधगती ऊब होती.
आज पुन्हा सापडले मला माझ्या तुटलेल्या माळेतले माणिक मोती.