वेळ नसतो हल्ली तुझ्याकडे माझ्यासाठी
कामच हल्ली तुझी प्रिया आहे
पण मग आठवतात मला ते क्षण
जेव्हा तू होतास फक्त माझा अन मी फक्त तुझी
कधीच नव्हतास तू दूर नसेल जरी मी जवळ तरी होतास फक्त माझाच
प्रेम काय असत ते मी विसरले होते
होतास तूच फक्त तेव्हा सांगायला मला
प्रेम कसे असते दाखवायला मला
वाटते कधी समजत नाहीच तुला
समजूनही जेव्हा बनवतोस बहाणा
पोळलोय तर खूप दोघेही आपण
जवळ आलो कदाचित त्यामुळेच पण
पण तरीही वाटत कधी तू समजून घेशील
शब्दांपलीकडे पण काही असते ते जाणून घेशील
कधी तरी म्हणशील....
.... जुन्या जखमा विसरलोय मी
.... आता बस हवाय मला थंडावा तुझ्या स्पर्शाचा
.... गंध हवाय रोज तुझ्या जवळ असण्याचा
.... हो हवियेस मला तू फक्त आतासाठीच नाही तर आयुष्यभरासाठी
.... प्रत्येक स्वप्न मी परत पाहीन आणि त्यात फक्त तूच अशील
खात्री आहे मला कधीतरी म्हणशील .....
........ Rani