प्रेम करणं काही गुन्हा नाही
पण म्हणतात,
खरं प्रेम एकदाच होतं
पुन्हा पुन्हा नाही..
स्वत:चं आयुष्य झोकुन द्यायचं
स्वत:चं अस्तित्व विसरून जायचं
प्रेमात पडल्यानंतर सारंच जगणं
रोजचच आयुष्य नव्याने जगायचं
रोजच खेळ नवा मनाचा,
होत ही तो जुना नाही
पण, खरं प्रेम एकदाच होतं
पुन्हा पुन्हा नाही..
-जय