या प्रेमाच्या ओलाव्याने ओथंबून गेले मन,
असंख्य गुजगोष्टिहून अधिक बोले निशब्दतेचा एकच क्षण.
आनंद सरितेचे लोट वाहे,शब्द पात्र अपुरे,
व्यक्त करण्या मी हतबल,भाव मनीचे सारे.
सर्व जाणिवा चाकर झाल्या,
या सौंदर्यानुभुतीच्या नाजुक चरनी,
गोडी एकाच शब्दाची,सुवास त्याच गंधाचा,
स्पर्श एकच हवासा,रुपही एकच लोचनि.
एकाच आसक्तिने आज निरासक्त जगातून झाला,
एकाच बंधाने सर्व पाश तोडावयास निघाला.
सावरे ना पाऊल आता बरे-वाईट दिसेना,
संकेताच्या रुक्ष बंधनात मन आता थांबेना,
निर्बंध झुगारुन पुन्हा तिथेच स्वत:ला चुकवील,
अनन्त कटु वचने झेलून पुन्हा तिच गोडी चाखिल.
या भाववर्षावात पुन्हा तुला चिंब भिजवावे,
अन त्या अनुभुतिने स्फुरलेले मुग्ध शब्द उधळावे.
क्षणभंगूर हे सुख स्मृतित चिरंजिव राहिल,
कारण दूराव्यातही,तुझ्या सहवासाचा सुगन्ध येईल..