कधी अवचित सये सामोरी येउनी जा
एकदाच मनभर अशी तू मला भेटुनी जा
विजेसारख असं तुझ हे येण
अन मला मोहवूनी निमिषात लुप्त होण
तरी तेजाळल रूप तुझं क्षणभरासाठी दाखवुनी जा
येताना कधी सोबत म्हणून पावसालाहि घेऊन ये
दवातल्या फुलापरी भीजल रूप तुझं,मला साठवू दे
मनातल्या अंदाजांचा सत्याशी सामना करून देऊनी जा
स्पर्शात माझ्या तू लाजून मोहरावे
त्या राक्तीमात हरवून मी माझा न राहावे
असा गोड लाजरा प्रीतीचा मुग्ध उखाणा घालूनी जा
कशी सहजच रुसतेस,कधी सहजच हसतेस
कसा ग लाडिक नखर्यात माझा जीव गुंतवतेस
कुठून शिकलीस असं वेड लावण ते कानात सांगुनी जा
आता नुरले अवधान अन सरले भानही
बघ ! कसा येतोय हा पूर चांदण्यांचा आतूनही
कधी अवघ तुझं नक्षत्रवैभव माझ्यावर उधळूनी जा
Honey