Author Topic: शरदाचे चांदणे  (Read 1628 times)

Offline kavitabodas

  • Newbie
  • *
  • Posts: 35
शरदाचे चांदणे
« on: April 21, 2011, 05:05:40 PM »
धुंद त्या रात्री पडले शरदाचे चांदणे
  भरला उरी सुगंध सख्या तुझिया कारणे
 
  मन माझे शोधीत तुजला
  फिरले असे दूर वरती
  भेटलास वळणावरती
  जीवलगा असा एकांती
 
  मन माझे चंचल इतुके
  शोधते नजर भिरभिरते
  वय इतुके अल्लड कसले
  तू नसता बघ हिरमुसते

Marathi Kavita : मराठी कविता