माहित नाही असा कसा आलास तू
वाल्वंतामध्ये शीतलह्रीन्सारखा बरसलास तू
आयुष्याचे जेव्हा उजाड रान झाले तेव्हाच हिरवळ घेऊन आलास तू
कुणी वाटत नव्हते आपले तेव्हा माझ्याच साठी आलास तू
सगळी नाती हरवली होती गोडवा तो विरला होता
फक्त एकाच हाकेने साखर पेरलीस तू
आयुष्य रिकामे अन भकास होते पण रंग सोबत आणलेस तू
सुंदर रेघोट्या ओढणे शिकवलेस तू
स्वप्न कधीच हरवली होती पण प्रत्यक्षात अनुभव दिलास तू
आयुष्य माझे सुंदर केलेस तू
आता जगावे वाटते पण ...... पण परत खूप खूप भीती पण .........
वाटते कधी देवाला त्या गरज माझी कळली असावी म्हणूनच तर माझाच बनून आलास
तू......
.... Rani