एक गोड एक तिखट
आवडेल पण भाजेल, ही तुझी वाट बाई बिकट
गोड माझ्या प्रियेचा तोरा तो काय
जशी नकट्या नाकावर रागाची साय

सुंदर माझ्या राणीची गोड मधुर वाणी
रागाचे काय विचारता राव, मी तर पाणी पाणी

गोड माझ्या प्रियेला कशाची नाही हो हाव
जरा उशीर झाला म्हणून फक्त आमटी आणि पाव!
पण, रोज रोज सकाळी मस्त चहा करून देते
तीन रुपयात आले आणि त्यात कोथिंबीर कशी काय घेते?
गोड माझ्या प्रियेच्या गालावर एक तीळ
आणि एक किस दिल्यावर म्हणे आपला हिशोब झाला नील
