तिची ती ना
मला बर्याच दा होकार कळवुन जायची
शब्द उमटत नसले तरी,डोळे बोलायचेच
डोळे बोलले तरी, ओठ रुसायचेच
बोलता बोलता कळून चुकलेली
तिची ती ना
मला बर्याच दा होकार कळवुन जायची !!१!!
पावसाच्या वाटेवर ती, डोळे लावून रस्त्याकडे पाहायची
मी दिसलो की खिडकीवरची सावली अलगद सरकायची,
तिची ती ना
मला बर्याच दा होकार कळवुन जायची!!२!!
तिच्या नजरेला भिडलेली, माझी ती नजर
तिची नजर घट्ट पकडून ठेवायची
ठेवलेली ती नजर तिच्याकडून, अलगद मिटायची आणि,
तिची ती ना
मला बर्याच दा होकार कळवुन जायची !!३!!
मी हसलो की तीची नजर मला रागाने रोखायची
गालावर पडलेली खलि मात्र, तिचा मोह तो सांगायची
तिची ती ना
मला बर्याचदा होकार कळवुन जायची !!४!!
डॉ. पल्लवी डोंगरे