Author Topic: बंध मैत्रीचे.....................?  (Read 2267 times)

Offline manoj vaichale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 111
  • Gender: Male
बंध मैत्रीचे.....................?
« on: May 04, 2011, 09:00:35 PM »
बंध मैत्रीचे
खरच नको देवुयत
नाव आपल्या मैत्रीला नवे
रहू दे असेच भाव निष्पाप अन निर्मलसे

दुराव्यत जपुयात
नाते आपले अपुलाकिचे
क्षण सारे सोयरे सुखाचे दुःखाचे मौनाचे

आणखी जवळ नको येवुयत
रहू दे अंतर पुसटसे
तरीही नसेल आपल्यात तुझे अन माझे

काहीच नको संगुयत
आपण आपल्या मनातले
समजुन घे सारे डोळ्यात माझ्या साठलेले

वेड़ी म्हन मला हवे तर
म्हण काय म्हणायचे ते
असेच जपयाचेत मला आयुष्यभर बंध आपल्या मैत्रीचे
मनोज वायचले


Marathi Kavita : मराठी कविता