मला प्रेमात धड-पडायचंय
आता बंद होतील त्या कट्ट्या वरल्या शिट्ट्या
रोमिओ मजनू च्या यादीत add होईल अजून एक पठ्या..
टपोरी गिरी सोडून काहीतरी नवीन TRY करायचंय
मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
एकच coffee, एकच ice-cream, एकच sweetcorn दोघामध्ये खायचंय..
कधी तिची scooty , कधी माझी pulser , कधीतरी सुसाट पन्हाळ्याला जायचंय..
रात्र- रात्र तिच्या आठवणीत जागणं....
massages, chatting, आणि गप्पा मारत बसणं..
च्यायला एवढे subject कुठून आणतात ?.. study करायचाय
आणि साला त्या चंद्रात दिसतं तरी काय.. हे मला बघायचंय..
मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
वासू- सपना माफिक वाळू वर नाव कोरणं....
maddy माफिक तिच्या घराबाहेर चक्करा मारणं..
मनाचं हूर- हूरणं आणि दिलाचं धड-धडणं... FEEL करायचंय..
मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
म्हणे, पाऊस सुद्धा प्रेमातला थोडा HATAKE असतो..
आठवणींचा एक मोर मनात थुई- थुई नाचतो..
shared छत्रीतली मजा कशी येते बघायचीय..
आणी पावसात एकदा सोबत तिच्या चिंब-चिंब भिजायचंय
तिच्या सौंदर्यावर एकदा, मग कविता करायचीय..
मुलायम केसांशी तिच्या लाडे-लाडे खेळायचंय..
गहिऱ्या त्या डोळ्यात LOST व्हायचंय..
नाजूकसं एक फुल त्या फुलाला gift द्यायचंय..
म्हणे corner seat movie ची मजाच बहुत खूब असते..
कडाक्याच्या थंडीत देखील मिळवायला एक ऊब असते.
Barefoot- hand in hand, किनाऱ्या वर चालायचंय..
तीच्या आठवणीत लाजत लाजत love-letter लिहायचंय
मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय
खरच.. प्रेमात धड-पडायचंय
Suyog Kulkarni.
mazikavita.88@gmail.com