Author Topic: जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील......  (Read 2362 times)

Offline aryanbhv

  • Newbie
  • *
  • Posts: 27
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील......   


जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील   
तुला माझी आठवण होईल   
तुझ्याही डोळ्यांत तेव्हा   
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल   

आठवणी जेव्हा माझ्या   
तुला एकांतात कवटाळतील   
तुझ्याही नजरा तेव्हा   
माझ्या शोधात सैरावैरा पळतील   

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील   
तेव्हा तुला मी दिसेन...   
त्याला शोधणा‍-या तुझ्या नजरेत   
तेव्हा फक्त मी असेन...   

तेव्हा तुला माझे शब्द पटतील   
तुझ्याही नजरेत तेव्हा   
माझ्यासाठी अश्रू दाटतील...   

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू   
तेव्हा तुझ्यावरच हसतील   
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना   
ते ऒठ तेव्हा माझे नसतील...!!!