सांग ना भेटेल का रे कधी कुणी मला .........
चुका ज्या केल्यात मी.. करेन मी त्या माफ करून मला जवळ घेणारा
छान वाईट कशीही वागले तरी शेवटी फक्त माझीच ना ग तू म्हणणारा
राग आला कधी मला तर माझा रुसवा दूर करणारा
दुखात असेन बुडालेली तरी जवळ घेवून हसवणारा
दुखाचे अश्रू माझे फक्त एका क्षणात आनंदाश्रू बनवणारा
स्वार्थी वाटते का रे मी??
हो ... कदाचित झालेय मी पण तरीही हवाहवासा वाटणारा मला .... भेटेल का रे कधी कुणी मला
काय असते प्रेम कळले वाटत असतानाच समजले सत्य जीवनाचे!! ....
कुणी कधी ना कुणाचे .... पण ....पण तरीही वाटते ....भेटेल का रे कधी कुणी मला
काय आणि कसे असते प्रेम ते फक्त दाखवून सांगून नाही तर त्याचा अनुभव देणारा
स्वप्न जशी पहिली होती कधी ..... कुठेतरी हरव्लीत आता .... ती शोधून देणारा
अजून काही गोड स्वप्न त्यात टाकून आयुष्यात ती पूर्ण करून देणारा ...
सांग ना भेटेल का रे कधी कुणी मला .........
नाती तर खूप आहेत आणि खूप हवी पण होती मला
पण गुंफण इतकी मजबूत होईल का कधी?
प्रेमाच्या ह्या वादळात हरवेन असे वाटते मला
खरच कुणी कधी शोधेल का रे मला?
-- Rani