प्रेमाच्या वाटेवरती मन उडतेय अजाणतेपणी
उडतोय फक्त गोंधळ भावनानाचा
प्रेम असते काय अजून नक्की कळलेच नाहीये
तरीही हवेहवेसे ते धुंद क्षण
जाणवतेय हळूच मागून येणारी ती आठवण
नेहमीचे तेच दिवस वाटतेहेत आता फुलपाखरांचे !!
ओल्या मातीचा तो सुंगंध वेडावून टाकतोय आता
हवेय काय जाणीव नाही याची अजून
तरीही मन मात्र फक्त पिंगा घालतेय
कुठे कुणाभोवती माहित असूनही नकार देतेय

नेहमीचाच तो स्पर्श मोहरोवतोय मनाला आता
हो... अरे खरच का पडतेय मी प्रेमातच!!