तू आणि मी भेटलो
कधी नव्हे ते बोललो
तसे नजरानजर तर नेहमीच व्हायची पण जाणूनबुजून चोरायचो
शब्दही तसे मनात नेहमीच बोलायचो
तू काही सांगितलेस मी दुसरेच काही ऐकले!!
मी जे मनात बोलले ते मात्र तू नक्कीच ऐकले
माहित नाही कसे पण बोलले मी
हसलास तू लाजले मी
नजरेचा खेळ बदलला क्षणात
दिखावा गळून पडला क्षणात
तुझी कुशी म्हणजे झाली माझी मऊ उशी
का आणि कधी..... माहितच नाही कशी
तेव्हाच कळाले मी आणि तू काही वेगळे कधीच नव्हतो
फक्त जाणीव त्याची अजून आपण घेतच नव्हतो
तू आणि मी भेटलो ..... हो आता खरेच भेटलो ..
----- राणी