प्रत्येक खट्याळ नजर तुझी असते माझ्यासाठी एक साठवण
पाहतोस असा कि घायाळ नेहमी होतेच फक्त मी
नजर अशी बदलतोस कि जसे नव्हेच तो मी !!
कळूनही सगळे दाखवतोस किती अजाण मी
माझे ते सगळे हवे तुला शब्दात नेहमी
मला मात्र सांगतोस समजून घेत जा हि निश्ब्द्तता नेहमी
असा कसा रे छळ मांडतोस माझा
नेहमीच मी हरावी वाटते का तुला?
हवेत मला पण शब्द.. हवेत ते धुंद क्षण
पण सांगू का एक तुला .....
हरण्यात तुझ्याशी पण असते एक मजा
जरी तू देत असतो मला प्रेम करायची सजा
समजणार मात्र तुला कधीच नाही असते ती एक वेगळीच नशा
छळत राहा असाच मला तू .. देत राहा सजा
पण रहावास तू मात्र फक्त माझा ...

-- राणी