Author Topic: प्रेम आणि वेडेपणा  (Read 3182 times)

Offline chetan (टाकाऊ)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 86
  • Gender: Male
प्रेम आणि वेडेपणा
« on: May 19, 2011, 10:05:30 AM »
प्रेम आणि वेडेपणा
 
 
  खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. जगाची उत्पती त्यावेळी झाली नव्हती आणि
  मानवाने या जगात आपले पाऊल रोवले नव्हते. त्यावेळी सगळे सद्गुण आणि
  दुर्गुण इकडे तिकडे फिरत होते. काय करावे हे न कळल्याने कंटाळले होते.
 
 
 
  एक दिवस ते सगळे एकत्र जमून काय करावं याचा विचार करू लागले. त्यांना
  खूपच कंटाळा आला होता. इतक्यात 'कल्पकते' ला एक कल्पना सुचली. ती
  म्हणाली, "आपण सगळे लपंडाव खेळूया का?" सर्वाना ती कल्पना एकदम आवडली.
  लगेच वेडा असणारा 'वेडेपणा' ओरडला, "मी आकडे मोजतो". या वेडेपणाच्या मागे
  लागण्या एवढं कुणी वेडं नसल्याने सर्वांनी त्याच्या म्हणण्याला मान्यता
  दिली. 'वेडेपणा' एका झाडाला रेलून उभा राहिला आणि मोजू लागला,........
  एक, दोन, तीन..............
 
 
 
  वेडेपणाने आकडे मोजायला सुरुवात करताच सर्व सद्गुण व दुर्गुण लपायला
  गेले. 'कोमलता' चंद्रकोरीच्या टोकांवर जाऊन बसली. 'देशद्रोह' कचऱ्याच्या
  ढिगात लपला. 'आपुलकी' नं स्वताला ढगांमध्ये गुंडाळल. 'खोटेपणा' म्हणाला
  कि 'मी दगडाखाली लपेन'. पण त्याचं सांगणं खोटंच होतं. प्रत्यक्ष तो एका
  तळ्याच्या तळाशी लपला. 'वासना' पृथ्वीच्या मध्यभागी लपली. 'लोभ' एका
  पोत्यात शिरू लागला आणि शेवटी ते पोतं त्यानं फाडला. वेडेपणा आकडे मोजतच
  होता...... ७९, ८०, ८१, ८२......
 
 
 
  बहुतेक सगळे सद्गुण, दुर्गुण वेगवेगळ्या ठिकाणी लपले होते. अजून 'प्रेम'
  मात्र कुठे लपाव याचा निर्णय न घेता आल्याने लपू शकलं नव्हतं. अर्थात
  आपल्याला याचं आश्चर्य वाटायला नको. कारण आपल्याला माहित आहे कि, 'प्रेम'
  लपवता येतचं नाही. 'वेडेपणा' आकडे मोजत होताच... ९५, ९६, ९७.... शेवटी
  शंभरावा आकडा उच्चारण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईने 'प्रेमा' ने एका
  गुलाबच्या झाडत उडी मारून स्वताला लपवलं. वेडेपणा ओरडला. "मी येतोय! मी
  येतोय!"
 
  'वेडेपणा' न सर्वांना शोधायला सुरुवात करताच आधी लगेच त्याच्या पायाशीच
  त्याला 'आळशीपणा' सापडला. कारण स्वताला लपवण्या एवढा उत्साह आणि शक्ती
  त्याच्यात नव्हती. नंतर त्याला चंद्रकोरीवरची 'कोमलता' दिसली. तळ्याच्या
  तळातून त्याने 'खोटेपणा' ला शोधले. पृथ्वीच्या मध्यभागातून 'वासना' शोधून
  काढली. एकापाठोपाठ एक सगळे शोधले, पण त्याला एकाचा शोध लागेना. त्या
  एकाला शोधता येईना म्हणून 'वेडेपणा' निराश झाला. तेवढ्यात 'मत्सरा' ने,
  त्याला शोधता येत नाही या मत्सराने ग्रस्त होऊन त्या 'वेडेपणा' ला
  म्हटले, "अरे, तुला 'प्रेम' सापडत नाहीये. ते त्या गुलाबाच्या झुडुपामागे
  लपलंय". 'वेडेपणा' ने एक लाकडाचा धारदार ढलपा घेतला आणि गुलाबाच्या
  झुडुपात तो भोसकला. एकदा..... दोनदा.... अनेकदा. शेवटी एक हृदयद्रावक
  किंकाळी ऐकू आली तेव्हा तो थांबला. त्या किंकाळीनंतर आपल्या चेहऱ्यावर
  हाथ झाकीत 'प्रेम' बाहेर आलं. त्याच्या बोटांच्या फटीतून रक्त ओघळत होतं.
  प्रेमाला शोधण्याच्या अधिर्तेमुळे 'वेडेपणा' ने त्या लाकडी ढलप्यान
  प्रेमाच्या डोळ्यांवर वर केले होते. वेडेपणा आक्रोश करू लागला, "अरेरे!
  मी हे काय केलं? काय केलं मी? मी तुला आंधळा करून टाकलं. आता मी याची
  भरपाई कशी करू? तुझे डोळे आता पूर्वीसारखे कसे करू?
 
 
 
  प्रेम म्हणाले, "तू काही माझे डोळे परत देऊ शकणार नाहीस. पण तुला जर
  माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तू माझा मार्गदर्शक हो. मला रस्ता
  दाखव."
 
 
 
  तेव्हापासून प्रेम आंधळ झालं आणि वेडेपणा त्याचा नेहमीचा सोबती झाला.
 
  --
  विजेता कधीच पळून जात नाहीत आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.
 
  काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा,
 
  झटापटी करा आणि त्या घडवून आणा.
 
  तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची
 
  किंमत स्वत:च निर्माण करा!!!

Majhya collection madhal

Kaviche naav mahit nahi
pan jyane koni lihale ....sarasssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss lihale
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: प्रेम आणि वेडेपणा
« Reply #1 on: May 19, 2011, 06:57:13 PM »
khup khup khup chan :-) thanks for sharing....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):