Author Topic: त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,  (Read 3963 times)

Offline aryanbhv

  • Newbie
  • *
  • Posts: 27
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,


करु दे की…
मला सांगा तुमचं काय गेलं ?
तो तिला बागेमधे एकांतात भेटला,
नको इतक्या जवळ जाउन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचं फ़ुल होवुन पेटला,
भेटला तर भेटुदे की,पेटला तर पेटुदे की,
तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलुन थोडचं नेलं?

[/size]त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की…
मला सांगा तुमचं काय गेलं ?

[/size]एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली,
पाउस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हा कोणी नव्हतं म्हणुन त्यांचं फ़ावलं,
आणि त्यानी तिला घरात घेउन चक्क दार लावलं,
लावलं तर लाउदे की,व्हायचं ते हो उदे की,
खिडकीतुन फ़ुकट सगळं बघता तर आलं,

[/size]त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की…
मला सांगा तुमचं काय गेलं ?

[/size]घरात जागा नसते,त्यांचं चालणारच टॅक्सित प्रकरणं,
ते थोडेच बसणार आहेत,पाणिनीचं घोकीत व्याकरणं,
गुलाबी थंडीचे परीणाम हे होणारचं,
कुणितरी कोणालातरी घट्ट मिठितं घेणारचं
घेतलं तर घेउ दे की,व्हायचं ते हो उदे की,
तुमच्या आमच्या पूर्वजांनी आणखी वेगळं ते काय केलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की…
मला सांगा तुमचं काय गेलं [/font]
 ???