पाऊलवाट वळाली,
पण पाऊल मात्र वळलेच नाही..
आयुष्याची उजवलता,
कधी दूरावत गेली, हे काही कळलेच नाही...
हे सगं, तिच्या कारण झालं !
तिच्या प्रेमात मी पडलो, पण कधी??
हे काही कळलेच नाही..
तिच्या प्रेमाच्या सहवासात,
कसा मी वाहत गेलो, हे काही कळलेच नाही...
काही काळात तिने बोलणं सोडलं..
ती रुसली हे कळालं, पण का ??
हे काही कळलेच नाही..
पण जणू हे काय होतं!
ही खरच, प्रेमाची गाठ होती,
की मैत्रीचा ओढावा..
हे काही कळलेच नाही....
आता तर, किती महिने निघून गेले,
ती दिसली सुद्दा नाही..
आणि कधी तिच्या आठवणीत ही कविता जमली,
हे काही कळलेच नाही..
खरंच सांगतो,
काही कळलेच नाही...!
-- जयेश पाटील (Jan-'09)