अल्लड अलगद अवखळ, तरीही
सलज्जतेचा शालू अंगभर
अधरावरची प्रणय चाहुली
टिपती नेत्रांमधली थरथर
मोहक कुंतल लाजबावरी
तुझी छटा रेशीम पिसापरी
चंद्रालाही देशील का तू,
सौंदर्याचे देणे कणभर??
मीच काढतो मोडून माझ्या
श्वासांवरच्या लक्ष्मणरेषा
फसव्या वेळा फसवे नाते
असो जरी वा तेही क्षणभर
- रोहित कुलकर्णी