तुला स्मरता सहजची
मनात फुलतो वसंत
आणि उद्विग्न मन
क्षणात होते शांत...........
आठवणींच्या हिंदोळ्यावर
मन झोके घेते निवांत
आणि क्षणासाठी का होईना
त्याला पडते जगाची भ्रांत...........
त्या मनाचा तेव्हा
ना लागतो मलाच अंत
पण आनंदाचे सोहळे तेव्हा
तो भोगतो नखशिखांत...............
मनी एक प्रतिमा तेव्हा
उमटते जणू रविकांत
मन विहार करून येई
गाठून एक विलक्षण प्रांत.............
पण क्षणात संपतो हा सोहळा
आणि मन पुन्हा मांडते आकांत
असेच काहीसे चालू राहायचे
कदाचित माझ्या अंतापर्यंत...................