मी केलं होत तिच्यावर प्रेम
पण ते सगळ खोट होत...
नुसता टाईमपास करायचा होता
म्हणून तिला प्रपोज केलं...
पहायचं होत प्रेम काय असत
म्हणूनच अगोदर तिला मैत्रीत घेतलं...
मैत्रीत जास्त वेळ न घालवता
डारेक्ट तिला प्रपोज करून टाकल...
माझ प्रपोजर लगेच पास होणार
हे अगोदरच मनात फिक्स केलं होत...
(माझ्या ह्या) स्वार्थी प्रेमाचा बाहेर issue होणार नाही
म्हणून हे प्रकरण गुपितच ठेवल होत...
ती "I LOVE U" बोलल्यावर मी response देत होतो
पण त्या शब्दाचा मुळ अर्थच गमावून बसलो होतो...
खोट प्रेमाचं नाटक जेव्हा तीला समजलं
तेव्हा तीच मन खूप दुखावलं...
दुसऱ्या दिवसाची पहाट माझ्या मनात प्रकाश करून आली
प्रेमाची एक छोटस अंकुर मनात रुजवून गेली...
तिची समजूत काढून तिच्या मिठीत शिरायचं होत
वेड-पीस मन हे तिच्यासाठीच झुरत होत...
ह्या जगाचा निरोप घेऊन ती माझ्यापासून (खूप) दूर गेली
(हृदयावर दगड ठेऊन म्हणालो)
माझ्यासाठी ही वेळ का निघून गेली.....
:-प्रसाद भेगडे