ॐ साईं.
“का मला छळतेस...?” चारुदत्त अघोर.(८/४/११)
पुन्हा पुन्हा तेच ते, का अशी उगाळतेस,
नको असलेला विषय,परत का हाताळतेस;
माझ्या वर रागावून,स्वतःच किती गळतेस;
चिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...?
मी मान फिरवली तर,पुन्हा ती वळवतेस,
माझ्या केसात बोटं फिरवून,का मधेच ओढतेस;
चिडलो मी तर,झपकन दूर पळतेस;
चिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...?
माझा नाक शेंडा,चीमटावून ओढतेस,
तो लालवला कि,मजेनं खोडतेस;
कोणत्या असुरी आनंदी,अशी तू रुळतेस;
चिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...?
जरा डूलकावलो तर,कानी दोरा घालतेस;
जागवलो मी तर,थापडून पालत्थेस;
क्षणभरही मी न दुरावा,म्हणून भोवती घोळतेस;
चिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...?
मध्येच हाथ-कुशी घेऊन,उदरी उचल्तेस,
अर्ध झोपी मला,मऊ पदरी साचल्तेस;
डोळे मी उघडले तर,तहानून वाळतेस;
चिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...?
माझ्या उघड्या पाठी,बोटं अंकावून कोडावतेस,
गुदगुदल्या अंगी,मला शहारून वेडावतेस;
माझ्या हरल्या कोडी हसून,खांदी नाक मळतेस;
चिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...?
छाती लपल्या केशी,त्या तिळाला शोधून काढतेस,
कोणता प्रिय तो,कि त्याला नखवून गाड्तेस;
मन गढीत आरोप लावून,सतत मला आळतेस;
चिमटे काढून,कान ओढून,का मला छळतेस...?
थकून खेळून माझ्याच खांदी,निर्धास्त विसावतेस,
तुझ्या घसरल्या केस-लटी,मला गुंतवून पिसावतेस;
कधी प्रेयासित लळावते,तर कधी निरागस बाळावतेस;
चिमटे काढून,कान ओढून का मला छळतेस...?
चारुदत्त अघोर.(८/४/११)