तू तिथे आणि मी इथे .......
वाटेला डोळे आहेत
मनालाही ओढ आहे,
तू तिथे आणि मी इथे
हि नियतीची खोड आहे .......
मैलाचे अंतर आहे
चेहराही दुरावला आहे,
तू तिथे आणि मी इथे
तरी डोळ्यात तुझे प्रतिबिंब आहे ...........
आवाजाहीन कान माझे
आतुर तुझ्या हाकेला,
तू तिथे आणि मी इथे
या अर्थपूर्ण शांततेला ........
आठवणीची सत्ता आली
दिवसाच्या या क्षणांना,
तू तिथे आणि मी इथे
हे अंतर मिटवताणा..........
मनालाही रोखले आहे
खूप काही बोलाला,
तू तिथे आणि मी इथे
म्हणून योग्य वेळेच्या प्रतीक्षेला .............
निता.......
१४/८/२०१०