तुम्हीच सांगा

?
पडली पडली, अरे का ओरडतो सारखा सारखा ?
कोण पडली , कुठे पडली , कशी पडली?
सांग एकदाशी मला ,
एकतर , कामात मला रस वाटत नाही ,
कोणाबरोबर बोलण्याची इच्छा होत नाही ,
जेवणाची मला गोडी राहिली नाही ,
झोपेचे काही भानच उरले नाही ,
स्वतःशीच मी एकसारखे बडबडते ,
डोळ्यासमोर तर दुसरेच दृश्य दिसते ,
न बोलता काहीतरी ऐकल्याचा भास होतो ,
आठवूनही काहीतरी विसरल्याच भास होतो ,
नाही माझ्या जवळ कोणी ,
तरी एक अस्तित्व जाणवते ,
आणि ........
तू सारखा ओरडतो , पडली पडली
सांगून टाक एकदाशी,
कोण पडली? कुठे पडली ? कधी पडली ?
अरे , तुच पडली, प्रेमात पडली, आताच पडली ,
मला नाही मान्य .....
आता तुम्हीच सांगा, खरच मी प्रेमात पडली

निता.................