Author Topic: आज तसच काहीतरी होत आहे...  (Read 3364 times)

Offline amitkoltepatil

  • Newbie
  • *
  • Posts: 3
  • Gender: Male
    • AMIT KOLTE PATIL CREATION
आज तसच काहीतरी होत आहे..
गवसलेल्या विश्वात हरवलो आहे !
मन अस्वस्त आहे..
सतत तुझेच ऐकवत आहे !
डोळे सैरवैर आहेत..
नसलेल्या तुला शोधत आहेत !
पावले हरवली आहेत..
वेडी अजुन तिथेच थांबली आहेत !
शब्द अबोल आहेत..
गप्प हुंदके देत आहेत !
क्षण सरत आहेत..
अवघे घाव घालत आहेत !
श्वास चालू आहे..
त्याचा ही नाइलाज आहे !
तुझी वाट पाहत आहे..
आज तसच काहीतरी होत आहे...
             -अमित कोलते पाटिल
http://www.facebook.com/amitkoltepatil