ॐ साईं.
“लेडीज छत्री”…. चारुदत्त अघोर(२२/६/११)
आठवतं? तू आणि मी खूप वादळी पावसात कॉलेज मधून बाहेर पडलेलो,
पण तुझ्याकडे लेडीज छत्री आणि मी तसाच अडलेलो;
तेव्हा तुझी नि माझी ओळखही नव्हती झाली,
पण कुठे तरी तू,एकदाच दिसल्यावर मनी जागा करून गेली,
किमान फक्त दोन ते आठवडे, कॉलेज चालू झाल्याचे,
आणि फक्त काहीच दिवस, तू क्लास मध्ये आल्याचे;
पण पहिल्यांदाच तू रूम मध्ये आलीस,तर माझं भान हरपलं,
त्या गरम विचारांनी,जसं विचारीत हृदयच करपलं;
योगायोगानेच त्या पावसात, आपण दोघंच उरलो पायी चालणारे,
बाकी सगळे आधीच गेले,भोवती घिरट्या घालणारे;
माझी हृदयीत धडधड,अचानक तीव्र गतीत प्रवासली,
त्या बुचीच्या झाडांची, मंद फुली दरवळ,अचानक सुवासली;
तू उस्फुर्त पणे मला, छत्रीत येतो का खुणावलं,
माझं बहारीत शहरालं मन,दव गणिती गुणावलं;
खूप उत्साही,आनंदी,मी नकळतच ओढावलो,
त्या लेडीज छत्रीत,कसाबसा मावून,पुरुषी जरा खोडावलो;
त्या तीव्र वार्या झोकी,तुझी चात्रीच हवी उडाली,
एक आकाशी आणि एक माझ्या अंगी, वीज कडाडली;
मी नकळतच तुला दोन्ही हाथी छतरावून छातीस टेकावले,
त्या वादळी पावसात,दोनाचे चार डोळे एक मेकावले;
तू निर्धास्त विश्वासानी माझ्या बाहुत विसावलीस,
माझ्या एक एक लागत्या स्परशांना,मोहरून पिसावालीस;
त्या क्षणी कळलं,प्रणयीत प्रेम हे किती ओसंडतं असतं,
कितीही मिळालं तरी,कधी तृप्तच नसतं;
आज त्याच कॉलेज समोरून,त्याच पावसात जातोय,
मोजून पंधरा वर्षानंतर तेच प्रणयीत गाणे गातोय;
पण तू...तू माहेरी आहेस,या वास्तवतेने ती रोमांचित विचार वाट अडवली,
ते सुंदर ओले क्षण पुन्हा अनुभवावे,म्हणून पुन्हा हवेत “लेडीज छत्री” उडवली;
त्या क्षणी तो थंड पाउस मला चिंब भिजवत होता,
बाहेर तो आणि आत....दुसरेच थेंब रिझवत होता...!!!
चारुदत्त अघोर(२२/६/११)