तू भेटलीस तेव्हा ,
एक स्वप्न सजलेले , ओठ हलकेच हललेले , मी बोलका बाहुला, तू चित्त जपलेले .
तू भेटलीस तेव्हा ,
सारे क्षण आठवले , तुज्या ओंजळीत लपलेले , प्रेमाचे वादळ , वारू चौफ्फेर उधळलेले .
तू भेटलीस तेव्हा ,
मन आनंदून गेले , क्षीण शरीराचे , कुठचे पळून गेले ,
मग ती वेळ आली , मी निघालो ,
तू अबोल झालीस , हिरमुसली .
डोळे भरून आले , सारे क्षण थांबले ,
मी परत येईन , हे वचन दिलेले ,
तू भेटलीस तेव्हा .
मैत्रेय