असा कसा पाऊस आला ,
तुझ्या साठी बांधून झुला ,
झोक्यावर झोके घेई ,
जसा भिडे गगनाला.
पावसात भिजलेली पायवाट ओली ओली,
चीकलात पावलांनी का खोडी केली,
अशी बेभान झालीस तू,
पावसात चिंब होऊन गेली.
थेंब पावसाचे , ओघळणारे ,
तुझ्या भिजलेल्या केसांचे ,
गोंडस रूप तुझे अन त्या भिजलेल्या ओठांचे,
रिमझिम हि संपूच नये,
हा पक्षी साद देत आहे.
तू मजजवळ नाहीस तरी पाऊस येतोच आहे.
मैत्रेय