जेव्हा तुला माझी आठवण येईल...
थोड मनात डोकावून बघ...
विरुन चाललेले ढग ..
पुन्हा दाटून येतील..
पाऊस पडणार नाही..
पण तळवे मात्र ओले होतील..
आता जरा बाहेर जाऊन बघ..
कदाचित एक वेडी सर बरसेलही तुझ्यासाठी..
तुला चिंब भिजवणारी..
आठवणींच्या सार्या वाटा,
मॄदगंधाने दरवळणारी..
एक सर..
तुझी अन् माझी......
-jay