भेट आता , संध्याकाळ जवळ आली ,
लाल किरणांची बरसात झाली ,
तू आठवण काढत असशील माझी ,
का उगाच माझ्या पापणीची फडफड झाली .
असाच निघालो समुद्रावर .
तुला शोधतोय क्षितिजावर ,
पाण्यात पाय सोडून बसलो ,
लाट सागराची मला भेटण्या आली .
लाटांचा आवाज आवडू लागलाय .
त्यांचा एकसारखेपणा ,
तुला प्रत्येक्षण आठवणं ,
माझा वेडेपणा .
असा का होते , काही सुचत नाही ,
ना बंध कसले ,न भान उरत नाही .
कळलेच नाही कधी अंधार झाला ,
तुझ्या केसांचा वारा अंग शहारून गेला ,
पाहुले हि वाजली ,ती तर तुजीच आहेत
तू आहेस इथे का भास तुझे आहेत .
हा लाटांचा खेळ , अन अंधार दाटलेला ,
तुझ्या माझ्या प्रीतीला असा पूर आलेला .
तू ,मी , अन हा उधाणलेला समुद्र ,
तू रातराणी तू गंधाळली रात्र .
मैत्रेय (अमोल कांबळे)