दुख: व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात
जेंव्हा आपलेच जवळचे दुख: देवून जातात.
आठवणीचे क्षण मागे ठेवून जातात
संथ आशा सागरात लाटा उसळून येतात.
हास-या चेह-या वरती काळे ढग जमू लागतात
नकळत पापण्या ओल्या होवून जातात .
प्रकाशमय जिवन अंधारमय होवून जाते
फुलणारे फुल थोडावेळ कोमजून जाते.
कळत नाही का दुख: देवून जातात मनाला
जगता येयील का घायाळ पाखराला.
अंकुश सोनावणे