जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
जेंव्हा उघडे नसतील डोळे माझे हे जग पाहायला.
तुझ्या आठवणीत मी एकदा तरी येईल का
जिवनामध्ये तुझ्या महत्व माझे असेल का.
----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
थांबतील का पाऊले तुझी वाटेवरून चालताना
रखरखत्या उन्हामध्ये सावली कुठेच नसताना.
---- जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
येणार कशी पालवी वाळलेल्या झाडांना
थांबतील कसे अश्रू थांबवणारे कोणी नसताना.
----जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
आठवणीत जेंव्हा अश्रू लागतील डोळ्यातून तुझ्या वाहयला
पाऊस बनून यावे लागेल मला अश्रू तुझे लपवायला.
---जमेल का तुला माझ्याविना एकटे जिवन जगायला
अंकुश सोनावणे