यात माझा काय गुन्हा
माझ्या मनाने तुझ्यावर प्रेम केले यात माझा काय गुन्हा
जाताना डोळ्यात अश्रू देवून गेलीस यात तुझा काय गुन्हा.
वाहणारे हे अश्रू होते मात्र आठवणी तुझ्या होत्या
उमललेल्या फुलांच्या पाकल्याच शिल्लक होत्या.
-------------------------- यात माझा काय गुन्हा
सुंगधीत फुलांचा सुगंधच शिल्लक नव्हता
डोळ्यासमोर मात्र अश्रूंचा पहाड उभा होता,
------------------------ यात माझा काय गुन्हा
पंख विरहीत पाखराला उडता येत नाही
तुझ्या आठवणीमुळे मग जगणे हि कठीण होई.
------------------------- यात माझा काय गुन्हा
मनात तुझ्या आठवणीचे काहूर दाटून येते
नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागते.
-------------------- यात माझा काय गुन्हा
अंकुश सोनावणे