आठवण
विसरून गेलीस तू तरी विसरू शकत नाही तुजला
विसरतो का कधी किनारा आपल्या विस्तीरण सागराला
तुज्या आठवणीमुळे जेंव्हा डोळे भरून येतात
जसे निळ्या शुभ्र आकाशात मेघ दाटून येतात
भरलेल्या डोळ्यामधुनी थेंब बनुनी पाझरत राहतात
थेंब थेंब पाझरुनी पाणी बनुनी वाहू लागतात
आठवणीच महापूर कसा थांबेल कळत नाही
एक आली कि तिच्यामागून दुसरी सर येतच राही
आठवणीच्या लाठा बनुनी मनात उसळू लागतात
क्षणभर का होईना समुद्र किनार्र्याची भेट घडवतात.
समुद्र किनार्र्याची भेट घडवतात.
अंकुश सोनावणे