असशील उभी एकटी किना-यावरती
स्पर्श करून जाईल लाट तुझ्या पायावरती.
येयील का आठवण माझी तुला.....................
वेडावलेल्या नजरेने सैर भैर पाहताना
पानावरचे थेंब पाझरून जाताना.
येयील का आठवण माझी तुला................
मृगजलागत समोर तुझ्या दिसताना
नसेल मिठ्ठीत तुझ्या मिठ्ठी मारताना.
येयील का आठवण माझी तुला................
घाबरून जाशील जेंव्हा विज चमकताना
सावरशील कशी स्वताला आधार नसताना.
येयील का आठवण माझी तुला................
वेडावून जाशील परतून तू येताना
काहीच शिल्लक मागे अस्तित्व माझे नसताना.
येयील का आठवण माझी तुला................
अंकुश सोनावणे