असे जिवन किती दिवस जगत राहायचं
उघड्या डोळ्यांनी सगळे पाहत बसायचं
हे असे किती दिवस चालायचं.........................
त्यांनी मारत राहायचं आणि आपण मरायचं
पकडलेत ते तर त्यांना सुखात जगवायचं
हे असे किती दिवस चालायचं.........................
मुलांनी पोरके वाहायचं स्त्री ने कुंकू पुसायचं
सरकारने फक्त मदतीचं आश्वासन करायचं
हे असे किती दिवस चालायचं......................
पोलिसांनी रस्ते अडवायचं गरिबांना तपासायचं
तरीही गुन्हेगारांनी मोकाठ फिरायचं
हे असे किती दिवस चालायचं......................
वेळ आली आता सगळ्यांनी एकजूट होण्याची
खांद्याला खांधा लावून दहशतवादाशी लढण्याची.
हे असे किती दिवस चालायचं......................
अंकुश सोनावणे