Author Topic: मैत्री कोणाशी करावी  (Read 2879 times)

Offline ankush.sonavane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
मैत्री कोणाशी करावी
« on: July 15, 2011, 12:00:53 PM »
मैत्री कोणाशी करावी 
धोधो पडत राहणा-या पावसाशी
नकळत भिजवून जाणा-या सरीशी
सोबत नसूनसुद्धा हवी हवी वाटणारी.
 
मैत्री कोणाशी करावी 
अथांग   आशा पसरलेल्या   समुद्राशी
किना-यावर येवून धडकणा-या लाटेशी
स्पर्श करून अस्तिव आपले सोडून जाणारी.
 
मैत्री कोणाशी करावी
थंडगार वाहणा-या या वा-याशी
मध्येच येवून जाणा-या झुळूकेशी
क्षणातच चेह-यावर स्मित फुलवून जाणारी.

मैत्री कोणाशी करावी
दुखात सोबत साथ असणा-याशी
संकटात साथ सोडून न जाणा-याशी
मैत्री नसावी मतलबी असणारी.
                                     अंकुश सोनावणे

Marathi Kavita : मराठी कविता