थंडगार वारा अंग शहारून गेला
कोमजलेल्या कळीला फुलवून गेला.
गुलाबी थंडीत एक स्पर्श देवून गेला
दुखावलेल्या मनाला आनंदीत करून गेला.
व्याकुलेल्या जिवाला थोडासा गारवा देवून गेला
भनाट वेगाने माळरानावर वाहत गेला.
स्थिरावलेल्या झाडांना नाचवून गेला
वेलीवरती झुलुके झुलवून गेला.
दुखी प्राणीमात्रांना सुख देवून गेला
आसा एक वारा मनी घर करून गेला.
अंकुश सोनावणे