पाऊस अन् जमिन ..
त्यांच नातं तरी किती सुंदर,किती हळवं..
ती..
त्याच्यासाठी नेहमीच....नेहमीच वाट पाहणारी..
अगदी आतुरतेने..
किती दिवस..
भेगाळलेल्या काळजाने,
त्याच्या स्पर्शासाठी तिष्ठत असणारी..
कधी आभाळात काळे मेघ जमतात..
तिच्या आशा पल्लवित होतात,
वाटतं..
आता तो येईल..
पण..नाही येत तो..
ती अगदी सुन्न होऊन जाते..,
पण तरीही त्याच्या आठवणींत व्याकुळ..
कधीतरी एक वळवाची सर येऊन जाते..
तिच्या दग्ध मनाला शांत करते..
तोही येताना किती अचानक..
किती मनस्वीपणे येतो..
तिच्या ह्र्दयावरली सारी दुखांची पुटं हळूहळू उतरवतो..
तिच्यासाठी कितीतरी रंगांची उधळण करणारा..
हिरवे कोंब तिच्यातून रुजवणारा..
तिच्यासाठी..
कधीतरी सोनेरी उन्हासोबत,
ऊन्-पाऊस म्हणून येणारा..
तर कधी रिमझिम सर बनून येणारा..
कधी मुसळधार बरसातीत भेटणारा..
त्याची रुपं तरी किती तिच्यासाठी..
मग तिसुदधा सगळं विसरुन..
म्रुदगंध दरवळून त्याच स्वागत करणारी..
दोघांच्या भावनांचा..
मस्त दरवळणारा सुगंध होऊन जातो एक..
चिखलात पाणी मिसळून जात..
एक्जीव होत राहतं...