प्रेम हे प्रेम असते
मला विसरून जाने हे तुझे प्रेम होते
विसरू कसे मी जे तुज्यावर प्रेम केले होते.
तुटून जाते फांदी दूर झाडाला हि दुख: होते
उभे असले तरी बुंध्याला सावलीची गरज भासते.
रणरणत्या उन्हामध्ये हिमंत नसते जगण्याची
तरी आशा ठेवून असते नवी पालवी येण्याची.
फांदीविना शोभा नाही उभ्या असलेल्या झाडाला
स्मशानात तुकडे होवून जाळणे येते नशिबाला.
जळून सुद्धा राखेरूपी अस्तित्व आपले ठेवून जाते
आठवणीमुळे डोळ्यात येते पाणी हेच खरे प्रेम असते.
-----------------------------------हेच खरे प्रेम असते.
अंकुश सोनावणे