स्त्री आणि दारू
जेंव्हा स्त्री आयुष्यात येते तेंव्हा जिवन सुंदर बनते
निघून जाते जिवनातून तेंव्हा मग दारूच सोबत देते.
रोज नवनविन स्वप्न रंगवली हि जातात
दारूच्या पेल्या मध्ये मग ती दिसू लागतात.
आनंदाच्याक्षणी मात्र सोबत स्त्रीची असते
दुख: विसरायला मात्र दारूच कामी येते.
म्हणे स्त्रीची सोबत पुरुषाला मरेपर्येंत आसते
मग जिवंतपणी पुरुषाला दारूची ओढ का लागते.
पुरुषावर स्त्रीपेक्षा दारूचे प्रेम जास्त असते
ती सोडून जात नाही तिला सोडावी लागते.
अंकुश सोनावणे