माझे प्रेम
सांगू तुला कसे माझे प्रेम माझे काय होते
कळले ज्यांना ते गप्प बसले बाकीचे हसत होते.
पाहून दुख माझे मेघ हि गहिवरून हा गेला
दिसू नयेत माझे अश्रू म्हणून स्वता धरतीवर आला..
वाटेल प्रकाशाची भिती सूर्य मावळून गेला
माझ्या भावनासाठी वाट मोकळी करून गेला.
अमावश्येचा चंद्रसुद्धा पौर्णिमेला येत होता
इतरांना प्रकाश देण्यासाठी कले कले ने वाढत होता.
चाहूल लागल होती मला नव्या पहाटेची
सवय लावून घ्याची होती तुज्याविना जगण्याची.
अंकुश सोनावणे