वाहणा-या मनाला थांबवणार
भरकटलेल्या जिवनाला दिशा देणार.
कोणीतरी आपलं असावं ..........
रुतताच काटा पायात पाणी डोळ्यात यावं
व्याकुलेल्या नजरेने गर्दीत शोधावं.
कोणीतरी आपलं असावं..................
वाहणा-या अश्रूला डोळ्यातच थांबवणार
चुकलेल्या पावलांना पायवाट दाखवणार.
कोणीतरी आपलं असावं .......................
दूर असूनसुद्धा जवळ भासणार
मृगजलागत डोळ्यासमोर दिसणार.
कोणीतरी आपलं असावं.....................
जिवनाच्या शेवटपर्यंत सोबत असावं
मरण सुद्धा मिठीत त्याच्या यावं.
कोणीतरी आपलं असावं ............................
अंकुश सोनावणे