घन ओथंबून आले मन चिंबवून न्हाले
स्पर्श थंडगार झाले मन आनंदून गेले.
तापलेल्या जिवाला गारवा मिळाला
सुकलेल्या फुलामध्ये सुगंध भरीला.
भुकेलेल्या जिवाला ओढ चा-याची लागली
भिरभिरणारी फाखरे घरट्याकडे निघाली.
वाळलेल्या झाडाला पालवी फुटली
हिरव्यागार शालुने डोंगर नटली.
स्वत:च्या दुख:ने रडत राही दाही दाही
अश्रुनी दुस-यांचे जीवन फुलवत जाई
अंकुश सोनावणे