Author Topic: माझे ते तुझेच  (Read 2990 times)

Offline ankush.sonavane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
माझे ते तुझेच
« on: July 22, 2011, 11:26:23 AM »

रंग माझे असले तरी चित्र मात्र तुझेच आहे
झोप माझी असली तरी स्वप्न मात्र तुझेच आहे.

           मन माझे असले तरी भावना मात्र तुझ्याच आहेत
           भुंगा मी असलो तरी कळी मात्र तूच आहेस.
 
शरीर माझे असले तरी मन मात्र तुझेच आहे
वेडा मी असलो तरी वेड मात्र तुझेच आहे.

           जगत असलो मी तरी जीवन मात्र तुझेच आहे
           कितीही दूर असलीस तरी आठवण हि तुझीच आहे.

लिहित असलो मी तरी शाही मात्र तूच आहेस
कवी मी असलो तरी कविता मात्र तुझीच  आहे.
                                                    अंकुश सोनावणे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझे ते तुझेच
« Reply #1 on: July 22, 2011, 12:01:04 PM »
खर्या भावना.....