अबोल प्रीत.
पाहीले मी तूझाया पासून दुर जाउन
पण मला ते जमलेच नाही
मन इतके रडले कि, पुन्ह हा विचार
मनात आलाच नाही
पण, तु................
तूच माझया पासून दुर गेलास
न राहुनही मला गप्प रहावे लागले
नाजूक मनाला इतके काटे बोचले, कि
मी रडले नसून माझे मनच रडले
निरोपही तूला देउ शकले नाही
मजबुर इतके मी होते
मनातली भावना तशीच राहुन गेली,
हातातली वेळ अशीच निघुन गेली की,
माझी अबोल प्रीत अबोलच राहुन गेली...........
sindu.