ताई म्हणजे दोन अक्षरांचा महासेतू
म्हणजेच तारणारा ईश्वर....
भावाच्या सुखासाठी झटते आयुष्यभर
रक्षाबंधनाच्या दिवशी बांधते मनगटावर
रेशमाचा कोमल धागा.... अन
भाऊबीजी कमरेला त्या कोमल धाग्याने पुरविते
अभय माया.......
माया, ममता दिली ग ताई!
तू तर माधुर्याचा विश्वास......
निर्मल सागर जैसे मन तुझे
पुरवी भावाची प्रत्येक आस....
ताई तुझ्या नजरेतून वाही निर्मल गंगाजल,
तुझे वात्सल्य झाले ईश्वरपूजा...
तुझे असणे म्हणजे भावासाठी
घोर अंधारात झुजलती प्रकाशरेषा...
ताई, तू म्हणजे माझ्या प्रेरणेची मूर्ती...
तुझवर गीत गाण्यासाठी तूच व्हावी माझी वाणी...
माझ्या असंख्य भावमुंग्याना तूच
तर देतेस चिमुटभर साखरपाणी....
तुझ्या आठवणीने ग ताई....
मज रस्ता न चुके पावली....
तुझ्याच तर प्रेमळ स्पर्शाने उजळली माझी सावळी सावली !
सांग तुला काय देऊ ग माउली?
तू म्हणजे तर त्या परमेश्वराची अनमोल देणगी !
या रक्षाबंधनी स्वामी तुला त्यांची सावली देवोत
तुला न लागो झळ दुखाची.......
- सचिन तांबोळी, नवापूर