Author Topic: पुन्हा नाही आता प्रेम वैगरे .. काहीहीऽऽऽ....  (Read 3295 times)

Offline शशि

  • Newbie
  • *
  • Posts: 16
६ लाच आला फोन जिग-याचा ,  "जरा बोलायचंय तुझ्याशी , बसायचंऽ  का ? "
मी : "ठीक आहे ".  काम तर नव्हतं आता काहीहीऽऽऽ....

गेलो जवळच्याच BAR  मध्ये,  कोप-यातच बसलो
जिग-या : काय घेणार ? , मी : चालेल यार , Whisky ,Vodka  काहीहीऽऽऽ....

Order दिली. RC ,सोडा . ग्लास भरला
सुचत नव्हतं आता काहीहीऽऽऽ....

ब-याच दिवसानंतर बसलो होतो
पहिलाच  पेग "Top to Bottom ". ऐकणार नव्हतो आता काहीहीऽऽऽ....

दोन पेग  झाले , "Gold Flake " सुलगावली
हं.. आता बोल काहीहीऽऽऽ....

जिग-या : तुझी ती भेटली होती , लग्न झालं तिचं.
मी : अरेऽऽ , यार काय म्हणतॊस ? माहित नाही काहीहीऽऽऽ....

जिग-या : अरे , Facebook वर बघितले नाही का ?
फोटो टाकलेत इकडचे तिकडचे ....काहीहीऽऽऽ....

मी : च्यायला .. मनातलं मनातच राहिलं
बोललोच नाही तिला काहीहीऽऽऽ....

मी : तिचं होतं यार माझ्यावर .. मला माहितेय
जरी बोलली नाही ती काहीहीऽऽऽ....

मी : खूप प्रयत्न केला होता बोलायचा
पण जमलंच नाही यार काहीहीऽऽऽ....

जिग-या : मला माहितेय यार. सोड आता. ती एकच आहे का या जगात ?
मनात आणू नकोस आता विचार काहीहीऽऽऽ....

मी : पण असं कसं विसरणार तिला , पहिलं प्रेम माझं
तुला नाही कळणार यार , माझ्या मनातलं काहीही....

मी : अरे आपले कवी म्हणतात ना
" प्रेम कर भिल्लासारखं बाणा वरती खोचलेलं"

जिग-या : पण बाण एकाच "दिला" वर मारायचाय
हे म्हणाले नाहीत काहीहीऽऽऽ....

जिग-या : यार आपल्याला एवढंच कळतं
आपली हीच प्रेयसी - ग्लासातली ..
भर पुढचा पेग , होऊ दे "Cheers"
तुझ्या लव्हसाठी , प्रेमासाठी वैगरे .. काहीहीऽऽऽ....

एक "Quarter" झाल्यानंतर  आलो खरा शुद्धीवर
ठरवलंच , पुन्हा नाही आता प्रेम वैगरे .. काहीहीऽऽऽ....


----------  शशि.. ( Connect me on Facebook page -  काहीहीऽऽऽ.... )
« Last Edit: July 27, 2011, 11:01:24 PM by shashicj »


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):